इंग्लंडचा राजा घालणार पुणेरी पगडी; किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्याला मुंबईचे डबेवाले लावणार हजेरी

मुंबई | येत्या 6 मे रोजी चार्ल्स (Charles III) यांचा ब्रिटनचा नवा राजा म्हणून राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या अनुषंगाने एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये जगभरातील अनेक मान्यवर सहभागी होतील. या शाही सोहळ्यासाठी आतापासूनच ब्रिटनमध्ये जय्य्त तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन आणि शोक समारंभानंतर राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली.

या राज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील ब्रिटिश दुतावासाकडून पाठवण्यात आले आहे. मुंबईचे डबेवाले आणि किंग चार्ल्स यांचं पूर्वपार मैत्री संबंध आहेत. त्यामुळे मुंबईत ब्रिटनच्या उच्चायुक्तांतर्फे मंगळवारी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल भेट म्हणून पाठवली आहे. त्याचबरोबर डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे. मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक उद्योजक महाराष्ट्र सर्कल सरकारमधील अधिकारी कॉमनवेल्थ देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित होते.

Dnyaneshwar: