मुंबईत दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगावतील पूर्वेत प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागली. त्यानंतर आता घाटकोपरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने परिसरतील लोकांमध्ये घबराट पसरली.
हवेत पसरले धुराचे लोट
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या नारायण नगर विभागात एक प्लॅस्टिकचे रॅपर बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या कारखान्याच्यावर सम्राट नावाची शाळा आहे. सुदैवाने ही शाळा बंद होती. गोदामाची आग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजूबाजूला रहिवासी वस्ती आहे. घटनेनंतर अग्मिशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
आगीनंतर लोकांची धावाधाव
घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये सम्राट शाळेजवळ नेमकी कशी आग लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या जीवितहानी झाल्याविषयी माहिती हाती आलेली नाही. या आगीत नागरिकांचं नेमकं किती नुकसान झालं, याविषयी माहिती समोर आलेली नाही. मात्र, आग लागल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये एकच धावाधाव निर्माण झाल्याचे दिसून आलं.