भोंगा प्रकरणा : मुंबई पोलिसांची ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय…

मुंबई : काल राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आणि राज्यभर वाद पेटू लागले. मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवले नाही तर हनुमान चालीसा वाजवली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आता भोंग्याच्या वादामुळे सध्या राज्यभर राजकारण पेटलं आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावरही या प्रकरणावर अनेक पोस्ट पडत आहेत . महाराष्ट्र पोलिसांकडून अशा पोस्टवर कारवाई करण्यात येत असून पोलिसांची ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय करण्यात आली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

तसेच या प्रकरणातील वाद निर्माण करणाऱ्या जवळपास ३००० पोस्ट सोशल मीडियातून डिलीट करण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण होतील असे मेसेज पाठवू किंवा फॉरवर्ड न करण्याचं आवाहनही केलं आहे.

याचप्रमणारे गृहमंत्री यांनी हि याबद्दल लवकर पाऊले उचलली जातील असं म्हंटलं आहे . राज्याचे पोलिस महासंचालक जिल्ह्याच्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये भोंग्याच्या वादावर चर्चा करणार असल्याचं समजतंय. तसेच नाशिक पोलिस आयुक्तांनी ही सर्व अनाधिकृत भोंगे खाली उतरवण्यासाठी आदेश दिले आहेत. सर्व धर्मियांना भोंगे लावण्यासाठी परवानगीची गरज असल्याचं सांगत अनाधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत .

Nilam: