महापालिका हद्द : २८ इमारतींचा समावेश
पुणे : महापालिका हद्दीतील अठ्ठावीस जुन्या धोकादायक इमारती या वर्षी महापालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. पावसाळा सुरू झाला की, या इमारती पडून रहिवाशांना, शेजार्यांना, ये-जा करणार्या नागरिकांच्या जीवितास धोका असतो.
त्यामुळे महापालिकेच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित रहिवाशांना नोटीस देऊन सतर्क केले जाते.
भाडेकरू, आवश्यकतेनुसार कारवाईदेखील करण्यात येते. शहरात झोन सात म्हणजेच नाना पेठ, सदाशिव पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ या भागांमध्ये धोकादायक इमारती आहेत. जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. ते पुढीलप्रमाणे. सी एक यामध्ये अतिधोकादायक इमारती येतात. त्या कधीही कोसळू शकतात, त्यामुळे त्या इमारती पाडून टाकाव्या लागतात. पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणार्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येतात. सी दोन धोकादायक इमारती यामध्ये इमारतींची महत्त्वाची देखभाल दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते. सी तीन यामध्ये किरकोळ देखभाल दुरुस्ती करून घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यापूर्वी विविध वर्तमानपत्र जाहिरात देतो. यामधून लोकांना सांगण्यात येते, धोकादायक इमारती खाली करा. धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या भाडेकरूंना महापालिकेच्या वतीने भाडेकरू प्रमाणपत्र दिले जाते. ज्या धोकादायक इमारती आहेत, अशा रहिवाशांनी महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र घेऊन इमारत खाली करून सहकार्य करावे. रहिवाशांचा वेळही वाचेल आणि हक्क पण जाणार नाही. अनेक भाडेकरू रहिवाशांनी सहकार्य केल्यामुळे अठ्ठावीस इमारती खाली करू असेही यावेळी सांगितले. सन २०१२ साली कसबा पेठेत धोकादायक इमारत पडून दुर्घटना झाली होती. त्या दुर्घटनेत ज्येष्ठ महिला व लहान बाळाचा मृत्यू झाला होता. संबंधित रहिवाशांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. मात्र रहिवाशांनी वेळीच इमारत खाली न केल्याने दुर्घटना घडली.
अचानक दुर्घटना घडली तर घाबरून जाऊ नये. अशावेळी वयोवृद्ध, लहान मुले यांना सुरक्षित स्थळी घेऊन जावे. महत्त्वाचे फोन नंबर, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक, पोलिस आपल्याकडे असावेत. गरजेपुरती सामग्री सोबत असावी. दररोजचा हवामान अंदाज लोकांना सहज उपलब्ध होतो, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. पुराचा धोका असेल तर अगोदरच स्थलांतर करावे.
- कार्यकारी अभियंता झोन सात
महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यातच आमच्या कसबा पेठेतील धोकादायक वाड्याला नोटीस दिली होती. अधिकाऱ्यांनी वाडा पाडण्यासाठी आम्हाला सांगितले असता आम्ही वाडा खाली करण्यास संमती दिली. वाड्याला शंभर वर्षे उलटून गेली होती. कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे.
— सचिन इथापे
उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन