विश्वासराव महाविद्यालयात संगीत, योगदिन उत्साहात

योगामुळे जीवन व्याधीमुक्त होण्यास मदत : दशरथ माने
निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगा हा प्रत्येकाने केलाच पाहिजे, योगाने जीवन व्याधीमुक्त होते, कामाची गती आणि तीव्रता वाढते, अधिकार्‍यांनी योगा, प्राणायाम दररोज केला तर मानसिक ताणतणाव कमी होऊन भ्रष्टाचार कमी होतो. योगामुळे नवीन पिढी व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित होते. स्वामी रामदेवजी महाराज आणि श्री श्री रविशंकर यांच्या इंदापूरमधील योग शिबिरामुळे ४० हजार लोकांना फायदा झाला आहे, असे मत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील मैदानात सोनाई परिवाराच्या सौजन्याने आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला
.

इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळंब (ता. इंदापूर) येथे शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन, तसेच जागतिक संगीतदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सशक्त, लवचिक, निरोगी शरीर आणि उत्साही मन यांच्यासाठी नित्य योगासने व संगीत यांच्या माध्यमातून शरीर व मन प्रसन्न ठेवता येत असल्याचे सांगितले.

जागतिक योगदिन व संगीतदिन साजरा करीत असताना कुटुंबात निरामय वातावरण राहण्यासाठी योग, प्राणायाम, तसेच मेंदू , हृदय, मानसिक संतुलन, उच्च रक्तदाब, फिटनेस, शांत, प्रसन्न मनासाठी सुमधुर संगीत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे, विज्ञान शाखाप्रमुख तेजश्री कोकाटे, क्रीडा विभागप्रमुख सुहास भैरट, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार डांगे, प्रा. डॉ. विलास बुवा, प्रा. डॉ. विजय केसकर, प्रा. प्रशांत शिंदे, प्रा. रविराज शिंदे, ग्रंथपाल विनायक शिंदे आदी प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जांब (ता. इंदापूर) येथील प्रतीक्षा सुनील पाटील यांनी योगप्रकार यांची माहिती देऊन वज्रासन, अर्धचंद्रासन, गोमुखासन, सुखासन, ताडासन आदी प्रात्यक्षिके सादर केली. प्रतीक्षा पाटील हिने अधोमुखश्वानासन आसनप्रकारात वर्ल्ड गिनिज बुक रेकॉर्ड ७५ मिनिटे ४४ सेकंद असा विश्वविक्रम केला. त्याबद्दल संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.

Nilam: