‘मविआ’ सरकारने महाराजांच्या ‘या’ शिलेदाराच्या समाधीला दिला नाही कवडीचाही निधी!

मुंबई : (Shambhuraj Desai On MVA Government) पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे अनेक गोष्टींवर मनोगत मांडले. मी राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उप मुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात.

दरम्यान देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ व वित्त राज्य मंत्री नात्याने याची मी विधानपरिषदेत घोषणा केली. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली.

मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत. आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा असे देसाई म्हणाले आहेत. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

Prakash Harale: