‘मविआ’च्या नेत्यांची सुरक्षा काढली, अन् नार्वेकरांची वाढवली, का? ते वाचा सविस्तर!

मुंबई : (‘MVA’ leaders Security was removed, and Milind Narvekar increased) महाविकास आघाडी सरकारमधील अनेक निर्णयावर कुरघोडी करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने मागील अनेक मंत्र्यांची सुरक्षा काढण्याचे आदेश दिले. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे बंडखोर आमदारांची सुरक्षा कायम ठेवली आहे, तर महाविकास आघाडीच्या अनेक जेष्ठ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. मात्र, सरकारशी जवळीक असणाऱ्या काही नेत्यांची आणि माजी मंत्र्यांची सुरक्षा मात्र जैसे थे ठेवण्यात आलेली आहे.

दरम्यान, आणखी एक विशेष बाब म्हणजे, काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरून आता एक राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागली आहे. शुक्रवारी अचानक शिंदे सरकारने रद्द केलेली नेत्यांची सुरक्षा आणि त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे नव्या सरकारने नार्वेकर, आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना अभय दिलं आहे. त्यातही मिलींद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नार्वेकरांवर सरकार इतकं मेहरबान का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नार्वेकरांच्या घरी गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर नार्वेकर आता शिंदे गटाला पाठींबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर काहीच दिवसांत नार्वेकर यांच्या जागी रवी म्हात्रे यांची नेमणूक झाली. त्यानंतर नार्वेकरांबाबत शिवसैनिकांमध्ये पसरलेली नाराजी यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊनच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.  
 

Prakash Harale: