“माझी कमाई देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त कारण…”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य

नागपूर | Amruta Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझी कमाई ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त आहे, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीसांनी उत्तरं दिली.

अमृता फडणवीस यांनी नागपूरमध्ये अभिरूप न्यायालय कार्यक्रमामध्ये एक विशेष मुलाखत दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी या अनोख्या न्यायालयाचं काम पाहिलं. तसंच मुलाखतीदरम्यान अमृता यांना त्यांच्या प्रोफेशनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

“आमृताजी तुमच्या आईंनी, सासूबाईंनी तुम्ही करियरिस्ट आहात म्हणून सांगितलं. तर माझा पुढचा आरोप असा आहे की देवेंद्रजींनी एकदा म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जास्त पैसे तर अमृता कमावते. हे खरं आहे का?” असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या अजेय गंपावार यांनी विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “हो खरं आहे. कारण त्यांनी जीवनात कधी पैसे कमवलेच नाही. त्यांनी फक्त लोकसेवा केली आहे”, असं अमृता यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: