“…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना खोचक टोला

मुंबई | Urfi Javed – गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात चांगलाच वाद सुरू आहे. चित्रा वाघ सातत्यानं उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत आहेत. तसंच यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली आहे. तसंच “आम्ही असा नंगनाच महाराष्ट्रात चालू देणार नाही”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली होती. यावर आता उर्फीनं एक व्हिडीओमधून चित्रा वाघ यांना खोचक टोला लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. चार भिंतीच्या आत तुम्ही काय करता हा तुमचा खासगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच कुणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी”, असं त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, आता उर्फीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीला पापाराझी छायाचित्रकार तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील? असं विचारतात. यावर उर्फी म्हणते की, “प्रेमाचं माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहील.” उर्फीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

Sumitra nalawade: