“ते म्हणत होते ‘मुंबईत येऊन दाखवा’, मी तर आलो काही झालं पण नाही” एकनाथ शिंदे

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर जोरात हल्लाबोल करणाऱ्या मुंबई महापालिकेतील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शीतलताई तुम्ही आमच्यासोबत आलेल्या आहात. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण पक्ष सोडलेला नाही. बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या विचाराने चाललेल्या शिवसेनेत आपण आहोत. काही लोक म्हणत होते मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने येऊन दाखवा पण काय झाल? उलट आमचाच एक आमदार वाढला. त्यांनी न्यायालयात चार याचिका दाखल केल्या पण आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Dnyaneshwar: