नागपूरला दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता

vande bharat sleeper dvande bharat sleeper d

नागपूर :

वंदे भारत ट्रेनला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशात १०० पेक्षा जास्त वंदे भारत धावतात, भारतामधील प्रत्येक राज्यात वंदे भारत धावतेय. आता लवकरच वंदे भारत (Vande भारत ) #स्लीपर ट्रेन धावणार आहे. वंदे भारत स्लीपरचे अनेक फोटो समोर आले आहेत. पहिली वंदे भारत स्लीपर दिल्लीला मिळणार असल्याचे समोर आलेय. महाराष्ट्रामध्ये वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केलाय. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यामार्गावर स्लीपर वंदे भारत मिळाली, त्यासाठी नागपूर विभागाने प्रस्ताव पाठवलाय. 

मोदी सरकारने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर ट्रेन (Sleeper Train) येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी बोगी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

Rashtra Sanchar:
whatsapp
line