मुंबई | Nakul Mehta Gave Advice To Pakistan After Losing To Team India – काल (28 ऑगस्ट) आशिया कप 2022 मध्ये टीम इंडीयानं पाकिस्तानचा दारून पराभव केला. त्यानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताने पाकिस्तानविरोधात एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने पाकिस्तानला एक सल्ला देखील दिला आहे.
नकुल मेहतानं भारताच्या विजयानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना ट्विट करत मजेशीर सल्ला दिला आहे. नकुलनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ”प्रिय शेजाऱ्यांनो, कृपया तुमच्या टी.व्हीला फोडू नका. तर त्यावर माझ्या मालिकेचा आनंद घ्या, क्रिकेटमध्ये काय ठेवलंय”. नकुलचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. तसंच त्याच्या या ट्विटवर नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, नकुल मेहतानं स्टार प्लस वरील ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा, प्यारा प्यारा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इश्कबाज’ आणि ‘दिल बोले ओबेरॉय’ सारख्या मालिकांमध्ये देखील तो दिसला होता. सध्या नकुल ‘बडे अच्छे लगते है 2’ मध्ये राम कपूरच्या भूमिकेत दिसत आहे.