“मुलं जन्माला घालू शकत नसल्यानं राहुल गांधी…”, भाजप नेत्याचं वक्तव्य

रामनगरा | Nalin Kumar Kateel On Rahul Gandhi – सध्या भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विदेशातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. अशातच कर्नाटकमधील एका भाजप नेत्यानं राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मुलं जन्माला घालू शकत नसल्यानं राहुल गांधी अविवाहित राहिले आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल (Nalin Kumar Kateel) यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी (5 मार्च) रामनगरा येथे भाजपच्या ‘जन संकल्प यात्रे’त नलिन कुमार कतिल बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना करोनाची लस घेऊ नका असं आवाहन केलं होतं. कारण लस घेतल्यानं मुलं होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकतं, असं ते सांगत होते,” अशी टीका नलिन कुमार कतिल यांनी केली आहे.

पुढे नलिन कुमार कतिल म्हणाले, “मुलं होतं नसल्यानंच राहुल गांधी हे अविवाहित राहिले आहेत.” तसंच त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सूरजेवाला यांनी कतिल यांना ‘जोकर’ म्हटलं आहे.

Sumitra nalawade: