मुंबई : शिंदे फडणवीस सरकार (Maharashtra Government) मधील नेत्यांत वाद असल्याचं काही दिवसांपासून दिसत आहे. सरकारला पाठींबा देणारे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांमध्ये एकमेकांवरील आरोपांवरून वाद सुरु असल्याचं दिसत आहे. त्यालाच धरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.
शिंदे फडणवीस सरकार हे असंवैधानीक असून सरकारचा अंत लवकरच होणार असल्याचं नाना पाटोले यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद फक्त अमरावती पुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अंतर्गत खदखद दिसत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. लवकरच अंतर्गत खदखदीमुळे शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. असा दावा नाना पाटोले यांनी केला आहे.