सातारा : (Nana Patole On mangal Prabhat Lodha) बुधवार दि. (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लोढांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सडकून टीका केली आहे. “ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार, गद्दार म्हणून ओळखतं, त्यांच्यासोबत महाराजांची तुलना हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. राज्यपाल जे बोलतात तेच मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. हा आवाज नक्की कोणाचा?”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे, अजित पवार, उदयनराजे भोसले, छगन भुजबळ, संजय राऊत यांनी देखील कडकून टीका केली आहे.
तर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) म्हणाले, मंत्री मंगलप्रभात यांनी माफीनामा नाही तर, राजीनामा देण्याची मागणी केली आहे. हा वाद कमी होतो न होतो तेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी लोढांच्या त्या वक्तव्याचे समर्थन करत, शिवरायांप्रमाणे शिंदेनी गनीमी कावा करत बंडखोरी केली असं म्हणाले आहेत.