(Nani Dasara Pre Release Profit) : साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पॅन इंडिया फिल्मचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. दसरामध्ये नानीनं हटके लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. त्याच्या लूकची तुलना अनेक नेटकरी पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लूकसोबत बरोबर केला आहे. या चित्रपटानं रिलीज आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांचे रेकाॅर्ड मोडीत काढणार असल्याचे दिसून येत आहे.
नानी हा साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आता नानी हा दसरा या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरला एका दिवसात सात मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची निर्मिती 65 कोटींमध्ये करण्यात आली आहे. तर या चित्रपटाचे डिजिटल आणि थिएटर राइट्स 29 कोटी आणि 48 कोटीमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे रिलीज आधीच या चित्रपटाला 12 कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे येत्या काळात हे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
श्रीकांत ओडेला यांनी दसरा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात साई कुमार, समथिरकानी, दीक्षित शेट्टी, संतोष नारायणन आणि जरीना वहाब हे प्रमुख भूमिका साकारणार असून अनेकांनी या भुमीका साकारलेल्या आहेत.