“खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार”

मुंबई | Narayan Rane On Dasara Melava 2022 – यंदाचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांंचे काय गुण आहेत? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे? त्यांच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रावरचं विघ्न दूर झालं आहे, गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकट आलं होतं. पण आता ते नाहीये. हे सरकार चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदेच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळं काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं, त्यांना डिवचू नका सगळं आहे त्यांच्याकडे, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.  

Sumitra nalawade: