“नारायण राणेंची किंमत सध्याच्या घडीला चाराण्याचीच”

मुंबई (NARAYAN RANE VIRAL PHOTO) : सध्या देशात भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलण्यावरून चर्चा सुरु आहेत. राम कदम यांनी एक ट्वीट करून नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबसाहेब आंबेडकर, नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेल्या नोटांचे फोटो शेअर केले होते आणि अशा नोटा असाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नोटांवर गणपती आणि महालक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी केली होती. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा चार आणेवर असलेला एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या त्या फोटोवरून राजकीय वर्तुळात मिश्कील टिपण्णी देखील करण्यात येत आहेत.

‘हे फायनल करा’ अशा आशयाच्या चार आणेच्या फोटोवरून महाराष्ट्रात राजकीय नेते नारायण राणे यांच्यावर टीका करत आहेत. अंबादास दानवे यांनी “नारायण राणे यांची सध्याच्या घडीला चारणे एवढीच किंमत आहे.” अशी मिश्कील टिपण्णी केली आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी देखील “नारायण राणे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचा फोटो पैशांवर आला तर आम्हाला चांगलंच वाटणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान,राणेंच्या या फोटोवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांवर नारायण राणेंचा फोटो बनवने हा संविधानाचा अपमान असल्याचं म्हटलं गेलं आहे.

Dnyaneshwar: