नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जातो. मन की बात असं नाव असलेल्या या कार्यक्रमाचा आज ८८ वा भाग प्रसारित करण्यात आला. आजच्या संवादामध्ये मोदींनी ग्रामीण भागामध्ये वाढत्या डिजीटल पेमेंटबाबत आनंद व्यक्त केला.
जनतेला संबोधताना मोदी म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे.
तसेच गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI) झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत असल्याचंही मोदींनी यावेळेस सांगितलं.
दरम्यान देशाला नवीन संग्रहालय मिळालं आहे. पीएम म्युझियममधून जनतेला पंतप्रधानांशी संबंधित रंजक माहिती मिळत आहे. त्यामुळे इतिहासाबद्दल लोकांची आवड वाढली असल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली आहे.