बर्लिन : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर असून सोमवारी सकाळी त्यांचं बर्लिनमध्ये आगमन झालं. मोदींचं आगमन होताच तिथल्या भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी एक आई आपल्या कडेवर आपल्या लहान मुलाला घेऊन सर्वात पुढे उभी होती. यावेळी नरेंद्र मोदी थेट या चिमुकल्याकडे जाऊन त्याच्याशी खेळू लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सला देखील भेट देणार आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नसताना दुसरीकडे पंतप्रधानांच्या युरोप दौऱ्याची विशेष चर्चा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बर्लिनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी तिथे राहणाऱ्या भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.