“…तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत”; विधानसभा उपाध्यक्षांच खळबळजनक वक्तव्य

मुंबई : (Narhari Zirwal On Eknath Shinde) “सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील” असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास करून निर्णय दिला जाईल असं सांगितंल होतं. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेची निर्णय प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचं विधान केलं असून माध्यमांना बोलताना ते म्हणाले की, “सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Prakash Harale: