लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते घेत असलेल्या मोठमोठ्या निर्णयांनीच ओळखले जातात . असाच त्यांनी अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशमध्ये सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
इतर सरकारी शाळांप्रमाणेच आता वर्ग सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावं लागणार आहे. याबाबतचे निर्णय उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्याचबरोबर इथून पुढे मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय कि नाही याची देखील पडताळणी होत राहणार असल्याची माहिती आहे. मदरशांमध्ये वर्ग सुरु होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणाबरोबरच राष्ट्रगीत म्हणणं हे देखील बंधनकारक असणार आहे.