राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, पहा कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

National Film Awards 2023 – आज (24 ऑगस्ट) 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, कलाकारांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या असून अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तसंच ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.

पहा कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं

राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – द काश्मीर फाइल्स

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकट्री: द नंबी इफेक्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी) आणि क्रिती सॅनन (मिमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)

सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग

admin: