अमरावती – हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणामध्ये हनुमान चालिसा पठणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधला होता. त्यासोबतच त्यांना काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पठण करावं असं आव्हान केलं होतं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राण यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. मात्र त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसा पठण करण्यास सांगितलं आहे. पाणीटंचाई, विजेची समस्या यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. मात्र, नागरिकांच्या समस्यांवर एक शब्दही मुख्यमंत्री जाहीर सभेत बोलत नाहीत. केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेतात हे योग्य नसल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.
दरम्यान, आम्ही हनुमान चालिसा पठण केले तर मुख्यमंत्र्यांना त्रास होतो. यामागचे काय कारण आहे, असा सवालही राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.