देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री! नवनीत राणांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

अमरावती : (Navneet Rana on Devendra Fadanvis) भाजप समर्थक अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राचा विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेय.

दरम्यान नवनीत राणा म्हणाल्या, या राज्याचा जर कुणी विकास करू शकतो तर ते फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात येत असून येणाऱ्या निवडणुकीत बडनेरा सोडून सर्व जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. जिथे जिथे फडणवीस यांचे पाऊल पडले तिथं विकासच होणार.आणि आमच्यासाठी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणा यांनी राष्ट्रीय पक्षात यावं. त्या राष्ट्रीय पक्षात काम करण्यायोग्य आहेत. त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा त्या पक्षात आल्या तर खऱ्या अर्थाने त्यांचा मानसन्मान केला जाईल. 2024 मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे बावनकुळे म्हणाले.

Prakash Harale: