मुंबई : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज अमरावतीच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाच पठण केलं. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेच पठण करावं, जेणेकरून महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर होईल. असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं होत. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा नाही म्हटली तर आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या आव्हानाने संतप्त शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली आहे.
नवनीत राणा मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार असल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी मातोश्रीवर एकच गर्दी केली. त्यांनी मातोश्रीबाहेर जमा होऊन जोरदार आंदोलन करत राणा यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. राणा यांनी मातोश्रीवर येऊन दाखवावं मगच त्यांना कळेल शिवसेना काय आहे ते. असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. दरम्यान वातावरण जास्त चिघळू नये यासाठी मातोश्रीबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.