“…तर आम्हाला फाशी द्या”; नवनीत राणा संतप्त

मुंबई : राणा दांपत्याच्या हनुमान चालिसा प्रकरणावरुन काल राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तंग असल्याचं पहायला मिळालं, काही अघटीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीनं पाऊलं उचलत खार पोलिस ठाण्यात राणा दांपत्याला तातडीनं हलवण्यात आलं. अखेरीस वांद्रे न्यायालयानं राणा दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयीन कोठडीचा न्यायालयानं आदेश दिल्यानंतर आता नवनीत राणा यांनी ट्विटरवर ट्वीट करत प्रतिक्रीया दिली आहे. राणा म्हणाल्या की, देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या

तसेच हनुमान चालिसाचं पठन करण महाविकास आघाडी सरकारच्या लेखी पाप आहे. खरतंर सरकारनं माझ्यावर कलम १२४ अ चा गुन्हा दाखल करुन मला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली आहे.

दरम्यान सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांकडून त्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. आज याप्रकरणी न्यायालयाात सुनावणीही पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

admin: