पुणे : आदिवासी भागातील पालकांनी आर्थिक अगतिकतेतून पोटच्या मुलांना विकल्याच्या घटनेची दखल घेऊन राज्यातील आदिवासींच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या. तसेच नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटाच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनांची त्वरित दखल घेऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत की काय याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अशा प्रकारच्या घटना आदिवासी भागात पुन्हा घडू नयेत यासाठी आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी गांभीर्याने प्रयत्न आदिवासी विकास विभागाने करावा अशी सूचना या वेळी त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने नुकतेच नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सल्लागार समितिची स्थापना करणार असल्याचे घोषित केलेे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण कृषी, आरोग्य आणि रोजगारविषयक काम करण्यात येणार असून त्याचा आढावा मुख्यमंत्री स्तरावरून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यभरातील आदिवासी कुटुंबांचा या पार्श्वभूमीवर रोजगार, शिक्षण, कृषी विकास मुद्द्यांवर प्राधान्याने विचार करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयातून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
शिक्रापूर येथे एका भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर बलात्कार
एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचे आई वडील घरी नसताना विशाल गायकवाड याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ताब्यात घतले आहे. या आरोपींवर योग्य ती कलमे लावून कठोर कारवाई करण्याच्या सूचना आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना दिल्या आहेत.
नाशिक जिल्हाधिकारी डी. गंगाधरन आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यात आला. तसेच नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल हिरामणी आणि अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. याविषयी पोलिस यंत्रणेकडून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल असे पोलिस अधिक्षक यांनी कळविले आहे.
राज्यातील पशुधनाला लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याबद्दल पशुसंवर्धन विभागाला निर्देश योग्य त्या औषधोपचार व लसीकरण याची माहिती पुरविण्याची डॉ. गोऱ्हे यांची पशुसंवर्धन विभागाला सूचना अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे.
पुणे शिक्षक आंदोलनाबाबत…
राज्यात प्राध्यापक भरती लवकरात लवकर होण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. काळे झेंडे दाखवून हे आंदोलन सुरू आहे. गेली पन्नासपेक्षा अधिक दिवस हे आंदोलन सुरू झाले आहे. चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर यांच्या विधानाबाबत निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. सेंट्रल बिल्डिंग येथे पुण्यात हे आंदोलन सुरू आहे. सरकारकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. शासन पातळीवर अनेकदा बैठक होऊनदेखील याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. १८००० जागा असून ८०००० पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत. मानधन वाढवून देण्याचीही मागणी हे शिक्षक करीत आहेत. या संदर्भात शिक्षक आमदार पुणे ते मुंबई मार्गावर पायी दिंडी काढून सरकारकडे मागण्या करणार आहेत.