मुंबई | Neena Gupta – बाॅलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्या त्यांच्या खासगी आयुष्याबाबत नेहमी मनमोकळेपणाने बोलताना दिसतात. आताही त्यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनबाबत खुलासा केला आहे.
सध्या नीना गुप्ता या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्या एका आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या नवीन चित्रपटात अनेक बोल्ड सीन पाहायला मिळणार आहेत. तसंच या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. दरम्यान, नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या ऑनस्क्रिन किसिंग सीनबाबत भाष्य केलं आहे.
‘इनसाईड बाॅलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, “तुम्ही एक कलाकार असल्यावर तुम्हाला प्रत्येक सीनसाठी तयार रहावं लागतं. तुम्हाला कधी चिखलात उतरावं लागतं तर कधी कित्येक तास उन्हात उभं राहावं लागतं. तर मी दिलीप धवन यांच्यासोबत एक मालिका केली होती. त्या मालिकेत सगळ्यात पहिला लिप टू लिप किसिंग सीन भारतीय टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला होता. त्यावेळी मला रात्रभर झोप नव्हती कारण तो सीन करायचा होता तेव्हा मी आणि दिलीप धवन चांगले मित्रही नव्हतो. आम्ही फक्त एकमेकांचे सहकलाकार म्हणून काम करत होतो.”
“हा सीन करण्यासाठी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. मला खूप टेंशन आलं होतं. तरीही मी स्वत:ला यासाठी तयार केलं होतं. जेव्हा तो सीन संपला तेव्हा मी अक्षरश: डेटाॅलने गुळण्या केल्या होत्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीला कीस करणं ही गोष्ट माझ्यासाठी न पचणारी होती”, असंही नीना गुप्ता यांनी सांगितलं.