“अखेर ती मला भेटली…”, अभिनेत्री नेहा शितोळेची पोस्ट चर्चेत

मुंबई | Neha Shitole’s Post Gone Viral – मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शो मधून प्रसिद्धी झोतात आलेली. तसंच नेहा नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन तिच्यासाठी एक सुंदर कलाकृती बनवली आहे. तिने याबाबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचे एक सुंदर चित्र पहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना नेहा म्हणाली, “अखेर ती मला भेटली. गेलं दीड वर्ष आमची चुकामूक होत होती.. आज शेवटी भेटायचा योग आला… आज आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या ह्या नव्या मैत्रिणीच्या रूपाने रखुमाईचं भेटली जणू… माझी माझ्या स्वतः शी पुन्हा ओळख करून देण्यासाठी… एका नवीन रुपात लवकरच तुमच्या समोर येणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या… हे चित्र काढलं आहे अक्षय सावंत यांनी.”

दरम्यान, नेहा ही सध्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तसंच काही दिवसांपूर्वी नेहा सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तसंत यानिमित्ताने तिनं एक खास रील देखील शेअर केलं होतं.

Sumitra nalawade: