बेशिस्त पीएमपी चालकांना दणका ! अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय…

पुणे :

पुणे शहरातील लाखो पुणेकरांचा प्रवासध्या वाहतुकीचे सर्वात मोठे साधन म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळही अनेक नवनवीन प्रयोग करुन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. रेल्वे स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर या ठिकाणी काही मिनिटांच्या अंतरावर बसेस उपलब्ध असतात आता प्रवाशांना चांगली सेवा मिळावी म्हणून आणखी एक उपक्रम पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरु करण्यात आला आहे

पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी नुकताच पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर सर्वात पहिला प्रयोग त्यांनी बस चालक आणि वाहकांना शिस्त लावण्यासाठी सुरु केला. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: बसस्थानकावर उभे राहून सामान्याप्रमाणे प्रवास केला.त्यावेळी बस चालकांची प्रवाश्यांसोबत असलेली वर्तवणूक आणि त्यातून त्यांना चांगले, वाईट अनुभव त्यांना आले. त्यामुळे आता चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे.

पीएमपी बेशिस्त चालकांची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला 100 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्रप्रताप सिंह यांनी बेशिस्त बस चालकावर करणार कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Dnyaneshwar: