न्यूझीलंड :
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जग सज्ज झालं आहे. जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये नवं वर्ष सर्वात आधी साजरं करण्यात आलं. भारताच्या ७ तास आधीच न्यूझीलंडमध्ये (New Zealand) नवं वर्ष साजरं केलं गेलं. भारतात रात्री बारा वाजता नव्या वर्षाचं सेलिब्रेशन होईल. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी नवं वर्ष साजरं केलं जाईल. न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी नवं वर्ष सुरू झालंय. भारताच्या सात तास आधी न्यूझीलंडमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनला जल्लोषात सुरुवात झाली. तर भारतानंतर ९ तासांनी अमेरिकेत नवं वर्ष (New Year) उजाडेल.२०२५ (2025) चं स्वागत करणारा पहिला देश किरिबाती प्रजासत्ताकमध्ये ख्रिसमस बेट आहे. प्रशांत महासागरातील हे एक लहानसं बेट आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ३१ डिसेंबरला दुपारी तीन वाजून ३१ मिनिटांनी किरिबाती इथं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सुरू झालं. त्यनंतर न्यूझीलंडमधील शहर ऑकलंड आणि वेलिंग्टनमध्ये नव्या वर्षाचा जल्लोष new year celebration 2025 केला जात आहे.