पुणे | महिलांवरील अत्याचाराची (women’s molestation case) प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra government) कठोर कायदे आणि न्यायालये स्थापन करत असली तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशातच पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा दीड महिना झाला असताना नव्या नवरीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कारणांवरून छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी 3 जुलै रोजी घडली. कौशल पिराजी भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत नवविवाहितेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विवाहाला एक वर्ष झाले होते. विवाहानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीकडे माहेरहून पैसे व दुचाकी आणण्याची मागणी केली. नोकरीचा एक वर्षापासूनचा पगार घेऊन येण्यासाठी तगादा लावला. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने लग्नाच्या दीड महिन्यातच नदीत उडी मारून आत्महत्या केली.