निगडी येथील यमुनानगर परिसरात गेली सात वर्षांभरापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असताना बिघाडाबाबतची माहिती सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यमुनानगर हे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेला उच्चभ्रू परिसर आहे. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, बँका, हॉस्पिटल्स व शासकीय कार्यालये आहेत, शिवाय अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे या भागात वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. मागील चार वर्षांपासून दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास त्रासही नागरिकांना होतो.
खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या दरम्यान सरपटणारे प्राण्यांची (साप, विंचू आदी) भीती वाढली आहे. गावात वीज कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात यावा किंवा तांत्रिक कर्मचारी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी आदींनी लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.