बीड : (Nilesh Lanke On Central Government) सध्याच्या ईडीच्या कारवाईवरुन आले दिसून येत आहे. ते कधी केव्हा, कुठे, कोणावर कशी कारवाई करतीय सांगता येत नाही. त्यामुळे देशातील विरोधी पक्षातील अनेकांनी ईडीच्या कारवाईचा धसका घेऊन ते भाजपला शरण येताना दिसून येत आहे. ज्या माणसाचं साधे बॅंकेत खातंं नाही त्यांच्या मागं देखील ईडी लागते, असं वक्तव्य राष्ट्रवादी-काॅंग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.
ईडीचं लय अवघड आहे, पाच सहा वर्षापूर्वी मला विचारलं असतं ईडी काय आहे तर मला पण सांगता आलं नसतं. मला ईडी काय असते ते २०१९ मध्ये माहिती झालं, असं निलेश लंके म्हणाले. निलेश लंकेंनी ईडीवर टीका करताच मंचावरील एका व्यक्तीनं म्हटलं की आमच्याकडे पिठाची गिरणी पण नाही ईडी कशी लागेल, त्यावर लंके म्हणाले पिठाची गिरणी काय ज्याचं बँकेत अकाऊंट नाही त्याला ईडी लागते, असं निलेश लंके म्हणाले.
निवडणुकीला उभं राहिल्यानंतर बँकेचं खात उघडलं. मार्च महिन्यात मला आणि सुनिल शेळकेंना ईडी लागली होती. आमच्या चौकशीला डायरेक्ट पंजाब आणि हरियाणातलं पथक आलं होतं. एखादा अधिकारी माझ्याकडे चौकशीला आला ना तर शंभर टक्के मलाचं पैसे देऊन जाईल, असं लंके म्हणाले. बीड जिल्ह्यातील कडा येथे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.