मुंबई | Nilesh Rane On Uddhav Thackeray – काल (26 ऑगस्ट) शिवसेनेनं संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत युती केल्याची घोषणा केली. यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते. या युतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून शिवसेनेवर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता भाजपचे नेते निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी या युतीचं समर्थन केलं आहे. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे.