Budget 2023 | अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प ( Budget 2023) सादर केले आहे. अर्थसंकल्प सदर करत असताना निर्मला सीतारमण यांची बोलताना चुकल्या आणि सभागृहात हशा पिकला. मात्र, आपली चूक झाल्याचं लक्षात येताच निर्मला सीतारमण यांनाही हसू आवरले नाही. त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागत वाक्याची दुरुस्ती केली.
अर्थसंकल्पात वाहनांच्या धोरणावर बोलत असताना निर्मला सीतारमण यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असा उच्चार करायचा होता. मात्र, भाषणात बोलताना त्या ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असं म्हणाल्या. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. निर्मला सीतारमण यांच्याही ही चूक लगेच लक्षात येताच त्यांनी ‘सॉरी’ म्हणत आपली चूक दुरुस्त केली आणि उपस्थितांचे आभार देखील मानले.
यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सॉरी… माझी चूक झाली आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जुनी प्रदुषित वाहनं बदलली जातील. हे धोरण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे.2020-21 च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख झाला होता. आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत आहे.” हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे.