“माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर,…” नितेश राणेंची ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना धमकी

सिंधुदुर्ग : (Nitesh Rane On Intimidation of voters) या ना त्या वादग्रस्त कारणाने राणे कुटुंब नेहणीच माध्यमांच्या चर्चेत असते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, “चुकून जरी माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एकाही रुपयाचा निधी देणार नाही. आता तुम्ही ही धमकी समजा, नाही तर काहीही समजा, आपलं कॅल्युकेशन स्पष्ट आहे,” अशी थेट धमकीच त्यांनी कणकवली मतदारसंघातील नांदगावमधील मतदारांना दिली आहे.

सध्या राज्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट आपल्या विचारांचा सरपंच आला नाही तर निधी येणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मतदान करताना एक लक्षात घ्या, कारण सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हानियोजन निधी असो, ग्रामविकासचा निधी असो, 2515 चा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो. सत्तेत असलेला मी आमदार आहे. त्यामुळे तुम्हाला गावाच्या विकासासाठी निधी पाहिजे असेल तर माझ्या विचाराच्या माणसाला विजयी करा असं ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. जर नितेश राणेच्या विचारांचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे असं राणे यांनी मतदारांना धमकी वजा इशारा दिला आहे. एखाद्या सत्ताधारी आमदाराने लोकशाही देशात असं मतदारांना धमकावणे कितपत योग्य आहे.

Prakash Harale: