वर्धा | Nitesh Rane On Amol Kolhe – काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजप (BJP) आणि शिंदे गटानं (Shinde Group) आक्षेप घेतला. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते काल (11 जानेवारी) वर्धा येथे एका जाहीर सभेत बोलत होते.
“तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करतो. त्याला सिरियलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. 2024 साली त्याला पराभूत करून टाकू. त्याला दाढी काढल्यावर कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरियल पुरताच आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “कोणीतरी पेपरवर काहीतरी लिहून देतो आणि आमचे अजित पवार तेच वाचून दाखवतात. तुम्ही काय वाचत आहात? संभाजी महाराज यांना वर्षानुवर्षे जी उपाधी लावलेली आहे, ती तुम्हाला अमोल कोल्हेमुळे लगेच पुसून टाकायची आहे का?” असं म्हणत नितेश राणेंनी अजित पवारांवरही टीका केली.
View Comments (0)