मुंबई | Nitesh Rane’s Tweet In Discussion – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर ईडीनं केलेली कारवाई ही सुडभावनेनं केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यावर भाजप नेत्यांकडून देखील ईडी कशी बरोबर आहे हे स्पष्ट केलं जात आहे. यामध्ये आता भाजप नेते नितेश राणे यांनी एक खळबळजन ट्विट केलं आहे.
“आता वेळ आली…” (It’s Time) असं लिहित नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे ईडीची पुढील धाड अनिल परबांवर असेल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नितेश राणे यांच्या ट्विटनंतर भाजपच्या नेत्यांना ईडीची पुढची धाड कुणावर पडणार हे कसं काय माहिती आहे? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या घरीही ईडीने धाड टाकली होती. काही दिवसांपूर्वी परबांच्या संबंधित दहा ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे तेही ईडीच्या रडारवर असल्याचं पहायला मिळालं होतं.