नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतुक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यातील जनतेला एक सुखद धक्का दिला आहे. बहुप्रतिक्षीत असा औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस हायवेच्या कामाची लवकरच सुरुवात होणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली आहे. एक्सप्रेस हायवे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास पुणे ते औरंगाबाद हे अंतर अवघ्याा सव्वा तासांत पुर्ण करता येणार आहे.
रंगाबाद येथे विविध रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस महामार्गाची महत्त्वाची घोषणा केली. या महामार्गावर 140 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळेस दिले.
तसेच 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टॅंडर्डसारखे असतील, असं आश्वासन द्यायलाही गडकरी यावेळेस विसरले नाहीत.