“नुसतं परमेश्वराच्या भरंवशावर राहून मुलं होत नाहीत, तुम्हालाही…”; नितीन गडकरींचा आत्मनिर्भर होण्याचा सल्ला

नागपूर : सर्वांचे आवडते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कायम त्यांच्या कामांमुळे आणि मिश्कील वाणीमुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर ते आपल्याच सरकारचे अधूनमधून कान टोचण्यात कसलीही हायगई करत नाहीत, त्यामुळेही ते बऱ्याचदा चर्चेत असतात. आज देखील त्यांनी मिश्किल शब्दांत सरकारला टोला लगावला आहे. आणि शेतकऱ्यांना सरकारच्या भरवशावर राहू नका असा सल्लाही दिला आहे.

नागपूर मधील अग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळी भाषणात ते बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन आणि बाजारपेठबद्दल मार्गदर्शन केलं. “मी माझं मार्केट शोधलं आहे, तुम्हीही तुमचं मार्केट शोधा… मी सांगतो हे सरकार-बिरकारच्या भरवशावर राहू नका… मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो.” असा शेतकऱ्यांना सल्ला देत सरकारवर देखील त्यांनी टोला लगावला.

“एक तर आपला विश्वास सरकारवर आहे… आणि परमेश्वरावर आहे. मुलगा झाला तर लोक लगेच म्हणतात परमेश्वरानं दिला… पण आरे बाबा, तुझं लग्न झाल्यानंतर तू पुढचं काही केलं नसतं तर मुलगा कसा झाला असता? परमेश्वर आवश्यक आहेच पण तुझे प्रयत्नही गरजेचे आहेत ना.” असं मिश्किल उदाहरण देत नितीन गडकरी यांनी उपस्थितांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला.

Dnyaneshwar: