महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाबाबत नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार सोबत नेले आहेत, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. अशातच यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

मला वाटते की महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकाराणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहत असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.

RashtraSanchar: