No Cow Hug Day : केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे (Cow Hug Day) साजरा करा हे फर्मान काढलं होत. या दिवशी गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक स्तरातून सरकारवर टीका झाली. राजकारण्यांकडून तर केंद्रावर टीका केली जात आहेच, पण नेटकरीही मिम्सच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवताना दिसत आहे.
आज केंद्र सरकारने चार ओळींचे पत्रक काढत आदेश मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली. भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचा आदेश पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला.
पशू कल्याण बोर्डाच्यावतीने 14 फेब्रुवारी रोजी Valentine’s Day ऐवजी Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट आली. गाईला मिठी मारल्याने भावनात्मक समृद्धी येईल असा तर्क देण्यात आला होता. सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा,” असे पशु कल्याण मंडळाने आपल्या आदेशात म्हटले होते. परंतु पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.