बीड | Sandip Kshirsagar – कोणीही इकडे तिकडे गेलं तरी मी शेवटपर्यंत पवार साहेबांच्या पायाशी राहीन, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (17 ऑगस्ट) बीडमध्ये (Beed) सभा घेत आहेत. या सभेत संदीप क्षीरसागर बोलत होते.
यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले की, आम्हाला काही आमदार म्हणाले की आम्ही सत्तेमध्ये आहोत. तसंच आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तसं तुमच्याकडे काय आहे? मी त्यांना म्हणालो आमच्याकडे पवार साहेब आहेत. त्यामुळे कोणीही इकते तिकडे गेलं तरी साहेब आयुष्यभर तुमच्यासोबत आणि तुमच्या विचारांसोबत जोडून राहणार आहे.
अनेल लोकांनी मला प्रश्न विचारला होता की, सत्ता की साहेब? हा प्रश्न संपायच्या आधीच मी उत्तर दिलं की, याबाबत मी विचारही केला नाही कारण मी शरद पवारांसोबतच राहणार आहे. मी शेवटपर्यंत त्यांच्या पायाशी राहीन, असंही संदीप क्षीरसागर म्हणाले.