“इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही, मोदी सरकारने… ”; शरद पवारांनी केली मोठी मागणी!

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण या प्रकरणावरून आक्रमक भूमिका मांडत पंतपधान मोदींना आवाहन केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, केंद्राने ओबीसी जनगणना करावी. “इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही,”सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या असं म्हणत पवारांनी मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी केंद्र सरकारने जनगणना करणं गरजेचं आहे जर ते करत नसतील तर अम्हाला एकत्र येऊन रस्त्यावर उतरावं लागेल असं पवार राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात बोलत होते.

दरम्यान,भारतीय राज्यघटनेने एससी, एसटी सुविधा त्यांचे अधिकार दिले आहेत.तर ओबीसी हा समाजात मोठा वर्ग आहे. तसंच त्यांना आधार,सन्मान द्यायची गरज आहे. समाजाच्या उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण दिलं पाहीले असं पवार म्हणाले. याचबरोबर पवार यांनी भाजपला सवाल विचारला की, माजी मुख्यमंत्री सांगतात धोका दिला, पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का?असं शरद पवार यांनी भाजपला विचारलं आहे.

Nilam: