मुंबई : (Nora Fatehi On jacqueline fernandez) बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या 200 करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात ती सहआरोपी आहे. आता नोराने जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मानहानीची केस दाखल केली आहे. नोराने काही वृत्तवाहिन्यांवर देखील मानहानीची केस दाखल केली आहे. त्यामुळे जॅकलिनाच्या मागचे संकट काही केल्या कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही.
नोरानं मानहानीच्या केसमध्ये दावा केला आहे की सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये चुकीच्या पद्धतीनं तिचं नाव ओढलं गेलं. तिचं म्हणणं आहे की,सुकेशशी कधीच तिचा थेट संबंध नव्हता,तर त्याची पत्नी लीनाच्या माध्यमातून ती त्याला ओळखत होती. तसंच,सुकेशनं दिलेल्या कोणत्याही गिफ्टला तिनं नकारच दिला आहे,ते स्विकारलेलं नाही. या केसप्रकरणामुळे दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.
नोराने कोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीत म्हटलं आहे की याप्रकरणात माझं नाव गोवल्यामुळे माझ्या प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम झाला आहे. तिनं दावा केला आहे की कितीतरी नवे प्रोजेक्ट तिच्या हातातून निघून गेले आहेत. यामुळे जॅकलिनने तिच्याविषयी दिलेल्या चुकीच्या स्टेटमेंटला तसंच मी़डियानं पसरवलेल्या बातम्यांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसानीसाठी जबाबदार ठरवलं आहे. पटियाला हाऊस कोर्ट नोरानं दाखल केल्या मानहानीच्या केस प्रकरणात 19 डिसेंबर,2022 ला सुनावणी करणार आहे.