सामान्य डोकेदुखी असू शकते ब्रेन ट्यूमर : डॉ. प्रविण सुर्वाशे

पुणे- Brain Tumor Awareness | डोकेदुखी हा सामान्य न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्याचा त्रास सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. तणाव, थकवा, अधिक चिंता करणे, नैराश्य, पुरेशी झोप न मिळणे, भूक, डिहायड्रेशन, अंधुक दिसणे आणि अधिक प्रमाणात मद्यपान या सर्व गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अनेक घटकांमुळे डोकेदुखी होऊ शकते, पण बहुतांश व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना माहित होत नाही की हे घटक ब्रेन ट्यूमर्सची सुरूवातीची लक्षणे असू शकतात.

ट्यूमर हा संभाव्य घातक आजार आहे, ज्यामध्ये मेंदूमधील पेशी असामान्यपणे वाढतात, ज्यामुळे संपूर्ण मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.असे मत मणिपाल हॉस्पिटल्समधील कन्सल्टण्ट न्यूरोसर्जन डॉ. प्रविण सुर्वाशे यांनी व्यक्त केले. डॉ. प्रविण सुर्वाशे म्हणाले, ’’आपल्या मेंदूवर दबाव असतो, कारण डोक्यावरील कवटी क्लोज्ड कम्पार्टमेंट आहे.

ब्रेन ट्यूमरसाठी उपलब्ध उपचार पद्धती…

– ब्रेन ट्यूमर्ससाठी शस्त्रक्रिया ही सामान्यपणे वापरली जाणारी उपचार पद्धत आहे. मेंदूच्या आरोग्यदायी भागांना
कोणतीही इजा न करता शक्य तितका कॅन्सर काढून टाकता येतो.
– काही ठिकाणी असलेले ट्यूमर्स सुरक्षितपणे काढता येतात, पण काही ट्यूमर्स अशा ठिकाणी असतात जेथून ते
मर्यादितपणे काढता येऊ शकतात. अंशत: ब्रेन कॅन्सर काढून टाकणे देखील लाभदायी ठरू शकते.
– शस्त्रक्रियेव्यतिरिक्त रॅडिएशन थेरपी व केमोथेरपी यांसारखे इतर उपचार देखील वापरता येऊ शकतात.
– शारीरिक, व्यावसायिक आणि स्पीच थेरपी या सर्व गोष्टी तुम्हाला न्यूरोसर्जरीमधून बरे होण्यास मदत करू शकतात.

ब्रेन ट्यूमरमध्ये हा दबाव वाढतो, ज्यामुळे तीव्र व वारंवार डोकेदुखी होते. या आजारामध्ये सकाळी देखील डोकेदुखी होऊ शकते, ज्यामुळे झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे व्यायाम, चालणे किंवा खोकणे अथवा शिकणे अशा व्यक्तीच्या दैनंदिन कृतींवर देखील परिणाम होऊ शकतो. काही केसेसमध्ये उलट्या होणे व अंधुक दिसणे हे देखील दिसून येते. फेफरे किंवा मिरगी हे मेंदूतील ट्यूमरमुळे होणार्‍या डोकेदुखीच्या गंभीर कारणाचे संकेत असू शकतात.’’

Dnyaneshwar: