गोविंदा आला रे… आता तृतीयपंथीय देखील फोडणार दहिहंडी; पुणे शहराला मिळाला ‘हा’ मोठा मान

पुणे | Pune News – सध्या सर्वांना उत्सुकता लागली आहे ती दहिहंडी (Dahihandi) उत्सवाची. अवघ्या काही दिवसांवरच दहिहंडी उत्सव आला आहे. त्यामुळे गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. तर यंदाच्या वर्षी तृतीयपंथीय देखील दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराला देशातील पहिले चार गोविंदा पथक स्थापन करण्याचा मान मिळाला आहे.

स्त्री-पुरूष समानतेसोबतच आता तृतीयपंथीयांनाही कायदेशीर ओळख मिळण्याच्या दृष्टीनं हे पाऊल टाकण्यात आलं आहे. आजपर्यंत सगळीकडे पुरूष आणि स्त्रियांचे गोविंदा पथक पाहायला मिळत होते. पण आता त्यांच्यासोबत तृतीयपंथीय देखील दहिहंडी फोडणार आहेत. तृतीयपंथीयांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 100 जणांचे चार संघ तयार करण्यात आले आहेत.

या प्रत्येक संघात 25 तृतीयपंथीय सहभागी असणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर ही दहिहंडी फोडण्यात येणार आहे. त्यासाठी चार संघ सज्ज झाले आहेत. तृतीयपंथीयांच्या दहिहंडीचे विशेष आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्या शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

admin: