एकवेळा फटकारे खाऊनही ‘त्याच’ कारणासाठी नुपूर शर्मा दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टात

बलात्कार करण्याच्या आणि हत्या करण्याच्या धमक्या येत असल्यामुळे नुपूर शर्मा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात. सर्व ठिकाणचे एफआयआर एकत्रित करून दिल्लीत सुनवाई करण्याची मागणी.

नवी दिल्ली – Nupoor Sharma : दोन महिन्यांपूर्वी एका टीव्ही कार्यक्रम दरम्यान माजी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोध झाल्यामुळे भाजपने त्यांना प्रवक्त्या पदावरून निलंबित केले. त्यांच्या वक्तव्यामुळे देशातील अनेक लोकांच्या भावना दुखावल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उदयपुर येथे झालेल्या हत्यामागे त्यांनी केलेले वक्तव्य कारणीभूत असल्याचंही कोर्टाकडून बोललं गेलं आहे.

नुपूर शर्मा यांच्या विरोधात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्लीमध्ये एकत्रित करून त्यावर सुनवाई करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका फेटाळत नुपूर शर्मा यांना फटकारले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शर्मा यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

नुपूर शर्मा यांना अनेकवेळा बलात्कार करण्याच्या आणि हत्या करण्याच्या धमक्या येत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात असलेले नऊ एफआयआर दिल्लीमध्ये एकत्रित करण्यासाठी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्याचबरोबर एफआयआरमध्ये त्यांच्या अटकेला स्थगिती द्यावी अशी देखील विनंती त्यांनी याचिकेमार्फात केली आहे.

Dnyaneshwar: